रविवार, १५ ऑक्टोबर, २०२३

ज्ञानराधा मल्टीस्टेट मधील ठेवी सुरक्षित , तिरूमला उद्योग समूहाच्या विविध कार्यालयावर आयकर विभागाचे छापे

छत्रपती संभाजीनगर- तिरूमला समूहाच्या विविध कार्यालयावर आयकर विभागाकडून छापे टाकण्यात आले .  बीड , पुणे , सोलापूर , छत्रपती संभाजीनगर आणि फलटण या ठिकाणच्या कार्यालयावर छापे टाकण्यात आल्याची बातमी काही वृत्त संस्थांच्या वेबसाईटवर देण्यात आली .

Dnyanradha Multistate 

आयकर विभागाला कुठल्याही व्यवसायामध्ये अनियमितता आढळून आल्यास त्या संस्थेची तपासणी करण्याचा अधिकार असतो ,  कदाचित बऱ्याच दिवसांपासून तिरूमला समूह आयकर विभागाच्या रडारवर असावा . सर्वसाधारणपणे बहुतांश व्यावसायिक आपला आयकर वाचवण्यासाठी वेगवेगळ्या आयडिया वापरून आयकर कसा वाचवता येईल हे पाहत असतात. कदाचित अशाच काही कारणामुळे तिरूमला समूहावर आयकर विभागाच्या धाडी पडल्या असाव्यात. 


ज्ञानराधा मल्टीस्टेट ही तिरूमला समूहाचीच एक शाखा समजली जाते . ज्ञानराधा मल्टीस्टेट ही पब्लिक सेक्टर मध्ये येते , तिरूमला समूहाचा  व्यवसाय हा प्रायव्हेट सेक्टर मध्ये येतो .  त्यामुळे ठेवी सध्या तरी सुरक्षित आहेत . 

 ज्ञानराधा मल्टीस्टेट मधील ठेवी जर चुकीच्या मार्गाने तिरूमला समूहाकडे वळती करण्यात आल्या असतील तर याचा मनस्ताप ठेवीदारांना होण्याची शक्यता आहे. छोट्या बँका किंवा पतसंस्था मध्ये नियमबाह्य पद्धतीने कर्ज वाटप केलेले असेल , किंवा संचालक मंडळांनी कर्ज उचललेले असेल तर अशा पतसंस्था किंवा बँका जास्त दिवस तग धरून राहू शकत नाही. 


Dnyanradha Multistate Corporate Office