औरंगाबादची शान तारा पान म्हणणे काही वावगे ठरणार नाही कारण जगात या क्वालिटीचे पान कुठेहि मिळणार नाही. विविध क्षेत्रांतील मान्यवरांना ताराचे पान खाण्याचा मोह आणि स्थानिक रहिवाशांचा आग्रह मोडवत नाही. आतापर्यंत अमिताभ बच्चन, शरद पवार, विलासराव देशमुख, राज कपूरच्या कुटुंबीयांनीही तारा पान सेंटरची चव चाखली आहे.
बर्फाच्या लादीवर ठेवलेल्या नागवेलीच्या पानांना खवय्यांची वाट पाहावीच लागत नाही. ग्राहक येताच सराईत हात पानाला करंजीचा आकार देतात, तर कधी लाडूचा. गुलाबाच्या पानात व चांदीच्या वर्खमध्ये सजलेली ही पाने ग्राहकांच्या तोंडात अलगद विरघळतात. ही वैशिष्ट्ये आहेत तारा पान सेंटरमधील पानाची..दररोज १० हजार पानांची विक्री या ठिकाणी होते.
ताराचे पान म्हणजे जेवणानंतरची मेजवानी
देखणेपण, लज्जत आणि स्वच्छता सर्व बाबी एकाच दुकानात ग्राहकांना मिळतात. त्यामुळेच गेल्या ५० वर्षांपासून या व्यवसायात शरफुद्दीन सिद्दिकी यांची हुकुमत आहे. पानाचे रसिक त्यांना 'शरफूभाई' नावाने ओळखतात. मॅट्रिक पास झाल्यानंतर शरफूभाई मुंबईला नोकरीच्या शोधात गेले. लहान मोठी कामे त्यांनी केली; पण जम बसत नसल्याने आईच्या आग्रहावरून ते परतले. आईच्या सल्ल्यानुसार त्यांनी पानाची दुकान उस्मानपुरा भागात सुरू केली. घरातील दागिने विकून त्यांनी हा व्यवसाय सुरू केला. त्यांच्या प्रामाणिक प्रयत्नाला यश मिळाले. शरफूभाईंच्या तारा पानची ख्याती विदेशातही पोहोचली आहे.

पानाची वैशिष्ट्ये आणि प्रकार
तब्बल 37 प्रकारची पाने तारा पान सेंटरमध्ये मिळतात. कोहिनूर मसाला पानाची किंमत पाच हजार रुपये आहे, तर हनिमून मसाला पान तीन हजार रुपये, राजा-राणी पान १००० रुपयांना मिळते. लग्नासाठी ही पानं मागविली जातात. बनारसी पानात 4 प्रकार, कलकत्ता पानात 14 प्रकार, लहू पानात 3 प्रकार, मगई पानात 4 प्रकार, र्जदा पानात 5 प्रकार आहेत. पानाची किंमत 3 हजार ते 7 हजार रुपये आहे. रोज दहा हजार पानाची विक्री करण्यात येते तारा पान सेंटर येथे.

का आहे कोहिनूर पान महाग ?
कोहिनूर पानाची किंमत ५ हजार रुपये आहे या पानाची किंमत एवढी का ? याचा कधी विचार केला का तर कोहिनूर पान हे सेक्स वाढविण्या करिता खाण्यात येते. स्पेशल कस्तुरी सुपारी ज्याची किंमत आहे ७० लाख रुपये किलो, केसर ज्याची किंमत २ लाख रुपये किली आहे. ८० हजार रुपये किलोवाला गुलाब, आणि विशेष अत्तर जो फक्त पश्चिम बंगाल येथे मिळतो आणि या सर्वासोबत मिळतो एक गुपित पदार्थ हा पदार्थ बनवायला काय वापरल्या जाते हे इथल्या कर्मचाऱ्याला देखील माहिती नाही. शरुफभाईला हे पान त्यांच्या आईने दिले होते तेव्हापासून हे पान त्यांनी विकायला सुरवात केली. जगात फक्त भारत आणि पाकिस्तानात पान खाणारे रसिक आहेत. मात्र, शरफूभाईकडील पान दुबई, कुवैत, जैदा या ठिकाणी पाठविले जातात. पान हा नाशवंत पदार्थ असल्याने पानाच्या दुकानाची कुठेही शाखा नाही. सध्या शरफूभाईनी ५० लोकांना या व्यवसायातून रोजगार दिला आहे.
Credit by -- www.khaasre.in