मंगळवार, २८ ऑगस्ट, २०१८

प्लंबरची मुलगी झाली हवाईसुंदरी.! परभणी_जिल्ह्यातील_पहिली_हवाई_सुदरी

परभणी : शहरालगतच असणार्या पेडगाव गावातील प्लंबर भगवानसिंग गौतम यांची कन्या काजल ही नुकतीच एअर ईंडिया कंपनीच्या विमानसेवेत हवाई सुंदरी म्हणून रूजू झाली आहे. काजलच्या यशाने या क्षेत्रात करिअर करू ईच्छीणार्या तरूणींना निश्चितच बळ मिळेल.!
सामान्य कुटुंबातील काजल हिचे शालेय शिक्षण पेडगावातीलच #जिल्हा_परिषद शाळेत झाले तर महाविद्यालयीन शिक्षण परभणीतील श्री. शिवाजी महाविद्यालयात पुर्ण झाले. बालपणापासूनच काजल आज्ञाधारक, अभ्यासू , चिकीत्सक व धाडसी स्वभावाची असल्याचे तिचे वडील भगवानसिंग सांगतात. वाचनाची आणि भाषणाचीही तिला आवड आहे. 7 वीत असताना सावित्रीबाई फुलेंवर केलेल्या भाषणात तिने तालुकास्तरावरील बक्षीसही पटकावले होते. हवाईसुंदरी बनण्याचा धाडसी निर्णयही तिचाच. तिनेच या पदासाठी दोन वर्षापुर्वी ऑनलाईन फार्म स्वतः भरला होता. ती सध्या बगलुरूतील एलांका एअरपोर्ट येथे प्रशिक्षण घेत आहे. मुली देखील आई-वडिलांचे नाव मोठे करू शकतात हेच काजलने दाखवून दिले आहे. असे मत भगवानसिंह यांनी व्यक्त केले.
काजलचे वडिल प्लंबरचे काम करतात यापुर्वी ते टेलर काम करायचे पण त्यात जास्त काम मिळत नसल्याने त्यांनी प्लंबरचा व्यवसाय स्विकारला. तर आई गृहिणी आहे. घरच्यांनी तिच्या या निर्णयाला पुर्ण प्रोत्साहन दिले. तिचे काका प्लंबर गोकुलसिंह पवार व त्यांच्या परिवाराचाही काजलच्या यशात सिंहाचा वाटा असल्याचे भगवानसिंह आवार्जुन सांगतात. 
प्लंबर भगवानसिंह गौतम व परिवाराचे सर्व मित्र परिवाराकडून अभिनंदन केले जात आहे.

रणजित कारेगांवकर, यांच्या पोस्ट वरून