शुक्रवार, १६ नोव्हेंबर, २०१८

औरंगाबाद मध्ये शहिद केशव गोसावी यांना अभिवादनाचा कार्यक्रम आज

*पाकिस्तानी सैन्यांनी 11 नोव्हेंबर रोजी शस्त्रसंधीचा भंग करून स्नायपरनी, राजौरी सेक्टर मधील नौशेरा भागात 24 मराठा रेजिमेंट चौकीवर हल्ला केला या भ्याड  हल्ल्यात दशनाम गोसावी समाजाचे स्व. केशव सोमगिर गिरी (वय-29) रा. शिंदेवाडी(श्रीरामपूर), ता. सिन्नर, जि. नाशिक यांचा गोळी लागल्याने म्रुत्यु झाला.*
*स्व. केशव सोमगिर गिरी यांच्या आत्म्यास शांती लाभो तसेच भारताने एक जवान गमावला त्यामुळे आपण महा दशनाम गोसावी सामाजिक संस्था, औरंगाबाद तर्फे उद्या दिनांक 16 नोव्हेंबर रोजी क्रांतीचौक, औरंगाबाद येथे दुपारी 04:00 ते 06:00 या वेळेमध्ये समाजाच्या वतीने प्रतिमा पूजन व श्रद्धांजली अर्पण करण्याचे ठरवले आहे तरी सर्व समाज बांधवांनी उपस्थित राहावे ही विनंती...🙏🏻🙏🏻*

*तर्फे,*
*महा दशनाम गोसावी सामाजिक संस्था, औरंगाबाद.*

*योगेश गुलाबराव बन*
*(संस्थापक अध्यक्ष)*
📲 *9595238888*

*चंद्रकांत अन्सिराम गिरी*
*(महाराष्ट्र कार्याध्यक्ष)*
📲 *9373191917*

*लक्ष्मण एकनाथ गिरी*
*(मराठवाडा अध्यक्ष)*
📲 *9527837991*

*सुभेदार मेजर सुखदेव बन*
*(जिल्हा अध्यक्ष औरंगाबाद)*
📲 *9730331085*

*व समस्त पद अधिकारी आणी समाज बांधव....🙏🏻🙏🏻*

मंगळवार, २८ ऑगस्ट, २०१८

प्लंबरची मुलगी झाली हवाईसुंदरी.! परभणी_जिल्ह्यातील_पहिली_हवाई_सुदरी

परभणी : शहरालगतच असणार्या पेडगाव गावातील प्लंबर भगवानसिंग गौतम यांची कन्या काजल ही नुकतीच एअर ईंडिया कंपनीच्या विमानसेवेत हवाई सुंदरी म्हणून रूजू झाली आहे. काजलच्या यशाने या क्षेत्रात करिअर करू ईच्छीणार्या तरूणींना निश्चितच बळ मिळेल.!
सामान्य कुटुंबातील काजल हिचे शालेय शिक्षण पेडगावातीलच #जिल्हा_परिषद शाळेत झाले तर महाविद्यालयीन शिक्षण परभणीतील श्री. शिवाजी महाविद्यालयात पुर्ण झाले. बालपणापासूनच काजल आज्ञाधारक, अभ्यासू , चिकीत्सक व धाडसी स्वभावाची असल्याचे तिचे वडील भगवानसिंग सांगतात. वाचनाची आणि भाषणाचीही तिला आवड आहे. 7 वीत असताना सावित्रीबाई फुलेंवर केलेल्या भाषणात तिने तालुकास्तरावरील बक्षीसही पटकावले होते. हवाईसुंदरी बनण्याचा धाडसी निर्णयही तिचाच. तिनेच या पदासाठी दोन वर्षापुर्वी ऑनलाईन फार्म स्वतः भरला होता. ती सध्या बगलुरूतील एलांका एअरपोर्ट येथे प्रशिक्षण घेत आहे. मुली देखील आई-वडिलांचे नाव मोठे करू शकतात हेच काजलने दाखवून दिले आहे. असे मत भगवानसिंह यांनी व्यक्त केले.
काजलचे वडिल प्लंबरचे काम करतात यापुर्वी ते टेलर काम करायचे पण त्यात जास्त काम मिळत नसल्याने त्यांनी प्लंबरचा व्यवसाय स्विकारला. तर आई गृहिणी आहे. घरच्यांनी तिच्या या निर्णयाला पुर्ण प्रोत्साहन दिले. तिचे काका प्लंबर गोकुलसिंह पवार व त्यांच्या परिवाराचाही काजलच्या यशात सिंहाचा वाटा असल्याचे भगवानसिंह आवार्जुन सांगतात. 
प्लंबर भगवानसिंह गौतम व परिवाराचे सर्व मित्र परिवाराकडून अभिनंदन केले जात आहे.

रणजित कारेगांवकर, यांच्या पोस्ट वरून