साहित्यरत्न आण्णाभाऊ साठे ,
त्यांच्याविषयी थोडक्यात काही खास..
तुकाराम भाऊराव ऊर्फ अण्णाभाऊ साठे हे महाराष्ट्राला एक शाहीर म्हणून परिचित असले तरी कथा आणि कादंबरी हे साहित्यप्रकारही त्यांनी ताकदीने हाताळले. तमाशा या कलेला लोकनाट्याची प्रतिष्ठा मिळवून देण्याचं श्रेय अण्णाभाऊंना दिलं जातं. पोवाडे, लावण्या, गीतं, पदं या काव्यप्रकारांचा त्यांनी सामान्य कष्टकरी जनतेत विचारांच्या प्रचारासाठी वापर केला. स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्यानंतरच्या काळात राजकीय प्रश्नांविषयी महाराष्ट्रात त्यांनी मोठी जागृती केली. त्यात संयुक्त महाराष्ट्र चळवळ, गोवा मुक्ती संग्राम या चळवळींमध्ये त्यांनी शाहिरीतून दिलेलं योगदान महत्त्वाचं आहे.
अण्णांनी वैजयंता, माकडीचा माळ, चिखलातील कमळ, वारणेचा वाघ, फकिरा अशा अनेक कादंबर्या लिहिल्या. ३०० च्या वर कथा लिहिल्या. खुळंवाडी, बरबाह्या कंजारी, कृष्णाकाठच्या कथा असे त्यांचे कथासंग्रहही प्रसिद्ध आहेत. त्यांनी स्टॉलीनग्राडचा पोवडा, महाराष्ट्राची परंपरा, मुंबईचा कामगार असे पोवाडेही लिहिले. निवडणुकीत घोटाळे, दुष्काळात तेरावा, अकलेची गोष्ट ही त्यांची वगनाट्ये प्रसिद्ध आहेत. दोनशे-अडीचशे गाणी, लावण्या त्यांनी लिहिल्या आहेत. कामगारांमध्ये त्यांची गाणी आणि लावण्या लोकप्रिय आहेत. संयुक्त महाराष्ट्रलढ्यात त्यांनी कामगार जागा करुन त्यांची एकजूट संघटना निर्माण केली.
"द्या फेकून जातीयतेला । करा बंद रक्तपाताला । आवरोनी हात आपुला । भारतियांनो इभ्रत तुमची ईषेला पडली । काढा नौका । देशाची वादळात शिरली । धरा आवरुन एकजुटीने दुभंगली दिल्ली । काढा बाहेर राष्ट्रनौका ही वादळात गेली।"
आण्णांनी लिहिलेल्या कादंबऱ्या
१ आग
२ आघात
३ अहंकार
४ अग्निदिव्य
५ कुरूप
६ चित्रा
७ फुलपाखरू
८ वारणेच्या खोऱ्यात
९ रत्ना
१० रानबोका
११ रुपा
१२ संघर्ष
१३ तास
१४ गुलाम
१५ डोळे मोडीत राधा चाले
१६ ठासलेल्या बंदुका
१७ जिवंत काडतूस
१८ चंदन
१९ मूर्ती
२० मंगला
२१ मथुरा
२२ मास्तर
२३ चिखलातील कमळ
२४ अलगुज
२५ रानगंगा
२६ माकाडीचा माळ
२७ कवड्याचे कणीस
२८ वैयजंता
२९ धुंद रानफुलांचा
३० आवडी
३१ वारणेचा वाघ
३२ फकिरा
३३ वैर
३४ पाझर
३५ सरसोबत
महाराष्ट्रामध्ये ज्या लेखकांना श्रेष्ठ मानलं जातं.त्यांच्या काही कादंबऱ्या,नाटके अनुवादीत आहेत. हा लेखक शाळेची पायरीही चढलेला नाही हे विशेष.
जातीमुळे या श्रेष्ठ लेखकाला डावलले गेले.
जयंतीच्या हार्दिक सुभेच्छा.
जग बदल घालूनी घाव । सांगुनी गेले मज भीमराव ।।
गुलामगिरीच्या या चिखलात । रुतुन बसला का ऐरावत ।।
अंग झाडूनी निघ बाहेरी । घे बिनीवरती घाव ।।
धनवंतांनी अखंड पिळले । धर्मांधांनी तसेच छळले ।।
मगराने जणू माणिक गिळीले । चोर जहाले साव ।।
ठरवून आम्हा हीन अवमानीत । जन्मोजन्मी करुनी अंकित ।।
जिणे लादून वर अवमानीत । निर्मुन हा भेदभाव ।।
" अशा आण्णांना त्यांच्या जयंती निमित्त कोटी कोटी प्रणाम."💐💐💐💐💐
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा