माझी शाळा माझा अभिमान.
पाथरी शहरासाठी यापेक्षा अधिक चांगली बातमी काय असू शकते की माळीवाडा जिल्हा परिषद शाळा , पाथरी महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळाअंतर्गत राज्यातील 13 भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय शाळांमध्ये निवडली गेली.
सह्याद्री अतिथीगृह येथे महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळाअंतर्गत राज्यातील 13 भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय शाळांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते डिजिटल पद्धतीने शुभारंभ झाला. या कार्यक्रमास केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर, राज्याचे शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे, महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे, कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, शिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव वंदना कृष्ण,आयुक्त विशाल सोळंखे, महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळाचे संचालक सुनिल मगर, शास्त्रज्ञ डॉ.विजय भटकर,शिक्षणतज्ञ सोनम वांचुक, सुलेखनकार अच्युत पालव उपस्थित होते. सदस्य स्वरूप संपत, प्राची पसाठे, फ्रान्सीस जोसेफ यांना अभ्यासक्रम निर्मितीतल्या सहभागाबद्दल गौरविण्यात आले. ज्येष्ठ शास्त्रज्ञ रघुनाथ माशेलकर, अनिल काकोडकर यांनी या कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या.