भारताची जगावर छाप आहे संविधान
धर्मग्रंथांच्या बापाचा बाप आहे संविधान
धर्मग्रंथांच्या बापाचा बाप आहे संविधान
ओस पाडले भेदाचे बुरुज आणि किल्ले
संघवादी पंड्यांना चाप आहे संविधान
संघवादी पंड्यांना चाप आहे संविधान
तळागाळातून आले नवे पुढारी नवे नेते
घराणेशाहीची कापा काप आहे संविधान
घराणेशाहीची कापा काप आहे संविधान
अच्छूताचे पोर बसे सर्वोच्च त्या पदी
मनू बेट्यांना डेंगूचा ताप आहे संविधान
मनू बेट्यांना डेंगूचा ताप आहे संविधान
अक्कल हुशारीने बळकावे उद्योगधंदे
टाटा-बिर्लांना केवढी खाप आहे संविधान
टाटा-बिर्लांना केवढी खाप आहे संविधान
तुरुंगातल्या बयेने घेतली अंतराळ भरारी
आई-बाईचे खंडिने माप आहे संविधान
आई-बाईचे खंडिने माप आहे संविधान
मिटले जुने शिक्के झाले ताठ मस्तक माथे
स्वाभिमानाचा बघा आलाप आहे संविधान
स्वाभिमानाचा बघा आलाप आहे संविधान
काल होते मागतकरी आज मालामाल
भीमकार्याचा उतूंग प्रताप आहे संविधान
भीमकार्याचा उतूंग प्रताप आहे संविधान
हरेकांना दिली विकासाची समान संधी
बांध घालणाऱ्या कोब्रा साप आहे संविधान
बांध घालणाऱ्या कोब्रा साप आहे संविधान
देशाने माझ्या नाही झुकावे कोणापुढे
सार्वभौम त्या भारताचा ज्ञाप आहे संविधान
सार्वभौम त्या भारताचा ज्ञाप आहे संविधान
प्रा.डॉ.आनंद इंजेगावकर
'सरनामा' लोकाशा नगर,जिंतूर रोड,
. परभणी.
'सरनामा' लोकाशा नगर,जिंतूर रोड,
. परभणी.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा