रविवार, १२ नोव्हेंबर, २०१७

बजाज नगर, औरंगाबाद येथे अनुसूचित जाती आरक्षण वर्गीकरण प्रबोधन सप्ताह निमित्ताने बैठक संपन्न झाली




 बजाजनगर,औरंगाबाद : दिनांक ११ नोव्हेंबर रोजी रात्री बजाजनगर, औरंगाबाद येथे मातंग समाजाचे जेष्ठ नेते अर्जुनराव गालफाडे  यांच्या निवासस्थानी अनुसूचित जाती आरक्षण वर्गीकरण प्रबोधन सप्ताह निमित्ताने बैठक संपन्न झाली.

 बैठकीच्या अध्यक्षस्थानी औरंगाबाद येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील अण्णा भाऊ साठे अध्यासन केंद्राचे संचालक प्रा. डॉ. संजय सांभाळकर होते.आरक्षण विषयावर होत असलेल्या देशभरातील आंदोलनाची माहिती, आजतागायत झालेली न्यायालयीन प्रक्रिया कॉ. गणपत भिसे यांनी सांगितली. कॉ. अशोक उफाडे यांनी यावेळी परभणी, जालना, बुलढाणा जिल्ह्यात झालेल्या बैठकीचा आढावा, अनुभव आणि मातंग समाज, महिला, विद्यार्थी, रोजगार आणि एकूणच मातंग समाजात आलेल्या नैराश्याविषयी संक्षिप्त मांडणी केली. उपस्थित कार्यकर्त्यांनी केलेल्या चर्चेत असे मुद्दे समोर आले.


●  आरक्षण लढाईत सर्व मातंग संघटनानी एकत्र येऊन शक्ती उभी करावी.
●  मातंग संघटनाची सुकानू समिती अथवा फेडरेशन तयार करावे.
●  सर्व संघटना/कार्यकर्ते यांना एकत्र आणण्यासाठी औरंगाबाद जिल्ह्यातील कार्यकर्ते पुढाकार घेतील.


याप्रसंगी कॉ. कोंडीबा जाधव, कॉ. किशोर कांबळे, मारोती गायकवाड, पांडुरंग भारस्कर, राजू रोकडे, मारोती वाघमारे, गोविंद शिंदे, नाना कांबळे, वैजनाथ सोळसे, सुशील लोखंडे, वैजनाथ सौदागर, अतूल रणनवरे आदी उपस्थित होते. अध्यासन केंद्राच्या संचालक पदी निवड झाल्याबद्दल डॉ. सांभाळकर सर यांचा सत्कार करण्यात आला.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा