पाथरी : मा.अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी युवक काँग्रेसने केलेल्या दहा हजार नवीन शाखांच्या संकल्पानूसार युवकांना राष्ट्रवादी विचारांच्या प्रवाहात आणण्याच्या दृष्टीने आज {०७ नोव्हेंबर } पाथरी शहरात 'राष्ट्रवादी युवक काँग्रेस'च्या एकूण वीस नव्या शाखांचे अनावरण करण्यात आले.
|
गौतमनगर |
|
हुशने आलम मोहल्ला |
|
गौतमनगर |
|
कैप्शन जोड़ें |
|
जोड कुंवा |
|
कैप्शन जोड़ें |
|
जायकवाडी कॉर्नर |
|
इंदिरा नगर |
|
कैप्शन जोड़ें |
सदर वीस शाखांमध्ये पाथरी शहरातील इंदिरानगर, गौतमनगर, सागर कॉलोनी, जायकवाडी कॉर्नर, हनुमान नगर, भीम नगर, बेकार मोहल्ला, कुरेशी मोहल्ला, चाबुकस्वार मोहल्ला, विलास गोखले नगर, लहुजी नगर, जैतापूर मोहल्ला, रसाळ गल्ली, नामदेव नगर, माळीवाडा, हुसने आलम मोहल्ला, पार मोहल्ला, एकता नगर व अहिल्या नगर या भागांचा समावेश आहे.
शाखा उद्घाटनासाठी राष्ट्रवादी युवकचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ.संतोष मुंडे, प्रदेश उपाध्यक्ष मेहबूब शेख यांच्या प्रमुख उपस्थितीसह शहरातील युवकांच्या उत्साहपूर्ण सहभागामुळे राष्ट्रवादीमय वातावरण झाले होते. नगर परिषदेत कार्यक्रमाच्या समारोपा दरम्यान, "२०१९ साली बहुमताने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सरकार आणण्यात खारीचा वाटा उचलण्यासाठी माझ्या युवा सहकाऱ्यांनी तत्पर रहावे" असे आवाहन नगर परिषद गटनेते मा.जुनैद दुर्रानी यांनी केले.
यावेळी पक्षाचे ज्येष्ठ नेते दादासाहेब टेंगसे, नगराध्यक्ष भोरे, युवक जिल्हाध्यक्ष शांतिस्वरूप जाधव, तालुकाध्यक्ष एकनाथ शिंदे, शहराध्यक्ष सुनील उन्हाळे, युवक तालुकाध्यक्ष खालेद शेख, शहराध्यक्ष सतीश वाकडे आदी पदाधिकारी उपस्थित होते .
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा