प्रती,
मा.श्री.सुरेश सखाबापू देशमुख.
विषय:- आपल्या नाकर्तेपणाचे उत्तर देणेबाबत...
महोदय,
मा.सुरेश देशमुख जी आपल्याला तर माहीतच आहे की, मागील २ वर्षांपासून आ.बाबाजानी दुर्राणी साहेबांनी विधान परिषद निवडणूकीसाठी मेहनत घेतली होती. २ वर्षात परभणी व हिंगोली जिल्ह्यात सर्व निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी तसेच काँग्रेस उमेदवार विजयी करण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता, दिवसरात्र त्यांनी प्रचार करून आपल्या उमेदवारांना विजयी केले. परंतु आपण त्या सर्वांचे पाणी केले.
बाबाजानी साहेब यांनी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी मोठी जय्यत तयारी केली होती, परंतु त्यादिवशीच पक्षाकडून उमेदवारी भरू नका असा आदेश आला. निष्ठावंत असलेल्या बाबाजानी साहेबांनी फॉर्म न भरता मोठ्या
दिलाने आपणास पाठिंबा दिला होता. तुम्हाला राष्ट्रवादी भवनमध्ये बोलावून माझी कसलीही नाराजी नाही हे सांगून पूर्ण ताकदीने तुम्हाला साथ देऊ असा शब्द दिला होता. मागील निवडणुकीत तुम्ही बाबाजानी साहेबांच्या विरोधात काम केलेले असताना सुद्धा...
माननीय देशमुख साहेब आपण सुद्धा आमदार राहिलेले आहेत, उमेदवार म्हणून काय जबाबदारी असते हे आपणास ठाऊक आहे. परंतु आजच्या निवडणुकीत आपण काय जबाबदारी पार पाडलीत? निवडणुकीसाठी काय नियोजन केले? काय रणनीती आखलीत? नांदेडचे नेतेमंडळी आपल्याला येऊन सांगतात, जिल्ह्यातील नेते आपल्याला येऊन सांगतात तरी आपण का घरात बसून राहिलात? मतदारांच्या साध्या भेटीगाठी सुद्धा घेतल्या नाहीत याची उत्तर द्या.
प्रचार न करता सुद्धा तुम्हाला २२१ मतदान मिळाले याचे श्रेय फक्त आणि फक्त वरपूडकर साहेब, बाबाजानी साहेब, भांबळे साहेब, केंद्रे साहेब, राजेशदादा यांनाच जाते. यांनी मेहनत घेतल्यामुळे व आपल्या मतदारांना आदेश दिल्यामुळे आपणास एवढे मतदान मिळाले ज्यात आपला काडीचाही वाटा नाही.
मी सुद्धा तुम्हाला मत दिलं आहे त्यामुळे माझा आपणास सवाल आहे की, आघाडीचे निर्णायक असे २९७ मते असून सुद्धा केवळ आणि केवळ आपल्या नाकर्तेपणामुळे हक्काची जागा गेली व बाहेरचा उमेदवार विजयी झाला. आपण मतदानाच्या ३ दिवस अगोदर घराबाहेर का निघाला नाहीत? जर घरातच बसायचं होत व लढायचंच नव्हतं तर उमेदवारी का घेतली? आमच्या हक्काच्या जागेच नुकसान का केलं याच उत्तर तुम्हाला परभणी-हिंगोली जिल्ह्यातील जनतेला व आम्हा मतदारांना द्यावं लागेल. आपल्या निष्क्रियतेच व नाकर्तेपणाच उत्तर द्यावच लागेल.
शेवटी एकच सांगतो, "देशमुख साहब बिना रस्सी के लट्टू नही घुमता ये बात ध्यान मे रखो."
आपल्या उत्तराच्या प्रतीक्षेत....
- जुनैद खान दुर्राणी.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा