शुक्रवार, १७ नोव्हेंबर, २०१७

हिंदुत्व आरोळ्या

हिंदुत्व आरोळ्या 



हिंदूंनो वेळ आहे आणीबाणीची 
लढण्याला तयार व्हा 
अन दुश्मनाच्या काळजाला 
भिडणारी तलवार व्हा
======================
आहेत ते मुठभर 
जेरीस  आणतात तुम्हाला 
मात्र  त्यांना माहित नाही 
हिन्दू म्हणतात कशाला 
======================
जर पेटला हिन्दू 
तर पेटेल जग सारे 
मग शोधित बसतील हे 
लपण्यासाठी निवारे  
======================
हिन्दू म्हणजे निखारा 
हिन्दू म्हणजे आग 
डिवचू नका हिंदूंना 
नसता पडेल तुम्हाला महाग
=====================
हिंदुत्वाची आग दाखवून दया त्यांना 
दाखवून द्या त्यांना 
मनगटातले  बळ 
खरेतर  एकच हिन्दू पुरे आहे
यांची बंद करन्या बडबड

======================
पाकिस्तान्यांना उद्देशून 


कवी -बाळासाहेब पुरी 
फोन-७७०९०३९८३३ 

विविध प्रश्नासंबंधी जिंतूर मधे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून भव्य महामोर्चा काढण्यात आला होता. काही छायाचित्रे.











रविवार, १२ नोव्हेंबर, २०१७

बजाज नगर, औरंगाबाद येथे अनुसूचित जाती आरक्षण वर्गीकरण प्रबोधन सप्ताह निमित्ताने बैठक संपन्न झाली




 बजाजनगर,औरंगाबाद : दिनांक ११ नोव्हेंबर रोजी रात्री बजाजनगर, औरंगाबाद येथे मातंग समाजाचे जेष्ठ नेते अर्जुनराव गालफाडे  यांच्या निवासस्थानी अनुसूचित जाती आरक्षण वर्गीकरण प्रबोधन सप्ताह निमित्ताने बैठक संपन्न झाली.

 बैठकीच्या अध्यक्षस्थानी औरंगाबाद येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील अण्णा भाऊ साठे अध्यासन केंद्राचे संचालक प्रा. डॉ. संजय सांभाळकर होते.आरक्षण विषयावर होत असलेल्या देशभरातील आंदोलनाची माहिती, आजतागायत झालेली न्यायालयीन प्रक्रिया कॉ. गणपत भिसे यांनी सांगितली. कॉ. अशोक उफाडे यांनी यावेळी परभणी, जालना, बुलढाणा जिल्ह्यात झालेल्या बैठकीचा आढावा, अनुभव आणि मातंग समाज, महिला, विद्यार्थी, रोजगार आणि एकूणच मातंग समाजात आलेल्या नैराश्याविषयी संक्षिप्त मांडणी केली. उपस्थित कार्यकर्त्यांनी केलेल्या चर्चेत असे मुद्दे समोर आले.


●  आरक्षण लढाईत सर्व मातंग संघटनानी एकत्र येऊन शक्ती उभी करावी.
●  मातंग संघटनाची सुकानू समिती अथवा फेडरेशन तयार करावे.
●  सर्व संघटना/कार्यकर्ते यांना एकत्र आणण्यासाठी औरंगाबाद जिल्ह्यातील कार्यकर्ते पुढाकार घेतील.


याप्रसंगी कॉ. कोंडीबा जाधव, कॉ. किशोर कांबळे, मारोती गायकवाड, पांडुरंग भारस्कर, राजू रोकडे, मारोती वाघमारे, गोविंद शिंदे, नाना कांबळे, वैजनाथ सोळसे, सुशील लोखंडे, वैजनाथ सौदागर, अतूल रणनवरे आदी उपस्थित होते. अध्यासन केंद्राच्या संचालक पदी निवड झाल्याबद्दल डॉ. सांभाळकर सर यांचा सत्कार करण्यात आला.


गुरुवार, ९ नोव्हेंबर, २०१७

पाथरी शहरात NCP च्या २० शाखांचे मोठ्या उत्साहात अनावरण

पाथरी : मा.अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी युवक काँग्रेसने केलेल्या दहा हजार नवीन शाखांच्या संकल्पानूसार युवकांना राष्ट्रवादी विचारांच्या प्रवाहात आणण्याच्या दृष्टीने आज {०७ नोव्हेंबर } पाथरी शहरात 'राष्ट्रवादी युवक काँग्रेस'च्या एकूण वीस नव्या शाखांचे  अनावरण करण्यात आले.
गौतमनगर 

हुशने आलम मोहल्ला 

गौतमनगर 

कैप्शन जोड़ें

जोड कुंवा 

कैप्शन जोड़ें

जायकवाडी कॉर्नर 



इंदिरा नगर 

कैप्शन जोड़ें

सदर वीस शाखांमध्ये पाथरी शहरातील इंदिरानगर, गौतमनगर, सागर कॉलोनी, जायकवाडी कॉर्नर, हनुमान नगर, भीम नगर, बेकार मोहल्ला, कुरेशी मोहल्ला, चाबुकस्वार मोहल्ला, विलास गोखले नगर, लहुजी नगर, जैतापूर मोहल्ला, रसाळ गल्ली, नामदेव नगर, माळीवाडा, हुसने आलम मोहल्ला, पार मोहल्ला, एकता नगर व अहिल्या नगर या भागांचा समावेश आहे.
शाखा उद्घाटनासाठी राष्ट्रवादी युवकचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ.संतोष मुंडे, प्रदेश उपाध्यक्ष मेहबूब शेख यांच्या प्रमुख उपस्थितीसह शहरातील युवकांच्या उत्साहपूर्ण सहभागामुळे राष्ट्रवादीमय वातावरण झाले होते. नगर परिषदेत कार्यक्रमाच्या समारोपा दरम्यान, "२०१९ साली बहुमताने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सरकार आणण्यात खारीचा वाटा उचलण्यासाठी माझ्या युवा सहकाऱ्यांनी तत्पर रहावे" असे आवाहन नगर परिषद गटनेते मा.जुनैद दुर्रानी यांनी   केले.
यावेळी पक्षाचे ज्येष्ठ नेते दादासाहेब टेंगसे, नगराध्यक्ष भोरे, युवक जिल्हाध्यक्ष शांतिस्वरूप जाधव, तालुकाध्यक्ष एकनाथ शिंदे, शहराध्यक्ष सुनील उन्हाळे, युवक तालुकाध्यक्ष खालेद शेख, शहराध्यक्ष सतीश वाकडे आदी पदाधिकारी उपस्थित होते .

रविवार, ५ नोव्हेंबर, २०१७

०७ नोव्हेंबर रोजी पाथरी शहरात पक्षाच्या २० शाखांचे उद्घाटन नगर परिषद गटनेते मा. जुनैद भैया दुर्रानी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.

संपूर्ण पाथरी तालुका राष्ट्रवादीमय करण्याच्या दृष्टीने ०७ नोव्हेंबर रोजी शहरात पक्षाच्या २० शाखांचे उद्घाटन नगर परिषद गटनेते मा. जुनैद भैया दुर्रानी यांच्या  हस्ते करण्यात येणार आहे.




सदर शाखांचा भव्य उद्घाटन सोहळा शानदार करण्याच्यासाठी आज राष्ट्रवादी भवन, पाथरी येथे आढावा बैठक घेऊन नियोजन करण्यात आले. यावेळी बाजार समितीचे उप-सभापती एकनाथ शिंदे, शहराध्यक्ष सुनील उन्हाळे, शहराध्यक्ष खालेद दादा, अल्पसंख्याक तालुकाध्यक्ष मुबारक चाऊस, युवक तालुकाध्यक्ष सतीश वाकडे, राष्ट्रवादीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.